Genesis 29:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राहेल ही याकोबाच्या मामाची म्हणजेच याकोबाची आई रिबका हिचा भाऊ लाबान याची मुलगी होती. याकोबाने जेव्हा राहेलीस पाहिले तेव्हा त्याने जाऊन विहिरीच्या तोंडावरील दगड लोटला आणि आपल्या मामच्या मेंढरास पाणी पाजले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोबाने आपला मामा लाबान ह्याची मुलगी राहेल आणि आपला मामा लाबान ह्याची मेंढरे पाहिली तेव्हा त्याने जवळ जाऊन विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून आपला मामा लाबान ह्याच्या मेंढरांना पाणी पाजले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा याकोबाने त्याचा मामा लाबानची मुलगी राहेल आणि लाबानाची मेंढरे पाहिली, तेव्हा त्याने विहिरीच्या तोंडावरील दगड बाजूला केला आणि आपल्या मामाच्या मेंढरांना पाणी पाजले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा याकोबाने आपल्या आईचा भाऊ लाबान याची मुलगी राहेल हिला व आपल्या आईच्या भावाच्या मेंढरांना पाहिले तेव्हा याकोबाने जवळ येऊन विहिरीच्या तोंडावरून दगड लोटला व आपल्या आईचा भाऊ लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजले.