Genesis 29:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपण तिच्या बापाच्या आप्तातील असल्याचे म्हणजे तिच्या बापाची धाकटी बहीण रिबका हिचा मुलगा असल्याचे त्याने राहेलीस सांगितले; तेव्हा राहेल धावत घरी गेली आणि या गोष्टी तिने आपल्या बापाला सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोबाने राहेलीस सांगितले, “मी तुझ्या बापाचा आप्त, रिबकेचा मुलगा आहे;” तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या बापाला हे कळवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याकोबाने राहेलला सांगितले की तो तिच्या पित्याच्या नात्यातील आहे आणि रिबेकाह हिचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावतच गेली आणि आपल्या पित्याला ही बातमी सांगितली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोबाने राहेलला सांगितले की, तो तिच्या वडिलाच्या नात्यातील आहे, म्हणजे रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावत गेली आणि तिने आपल्या बापाला सांगितले.