Genesis 29:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने समोर पाहिले तेव्हा त्याला एका शेतात एक विहीर दिसली; त्या विहिरी जवळ शेरडामेंढराचे तीन कळप बसलेले होते; ही विहीर त्यांची पाणी पिण्याची जागा होती. या विहिरीचे तोंड एका मोठया दगडाने झाकलेले होते;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे त्याने पाहिले तर एका शेतात एक विहीर होती; तिच्या आसपास शेरडामेंढरांचे तीन कळप बसलेले होते; कारण त्या विहिरीतून त्या कळपांना पाणी पाजत असत; त्या विहिरीच्या तोंडावर धोंडा होता तो मोठा होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला समोरच्या मैदानात मेंढरांचे तीन कळप, एका विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी बसलेले दिसले, परंतु एका मोठ्या दगडाने विहिरीचे तोंड झाकून ठेवलेले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने पाहिले तेव्हा त्यास एका शेतात एक विहीर दिसली आणि पाहा तिच्याजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. या विहिरीतून कळपांना पाणी पाजीत असत आणि या विहिरीच्या तोंडावरचा दगड मोठा होता.