Genesis 29:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी सकाळी याकोबाने लेआला पाहिले तेव्हा आपण रात्री लेआबरोबर एकत्र निजलो असे त्याला समजले; मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला फसवले; मला राहेलीशी लग्न करता यावे म्हणून मी अतिशय काबाडकष्ट केले; तुम्ही मला असे का फसवले?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सकाळ झाली तेव्हा पाहतो तर ती लेआ; मग तो लाबानास म्हणाला, “आपण माझ्याशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना? मला का फसवले?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण याकोब सकाळी उठून पाहतो, तर ती लेआ होती! याकोब लाबानाला म्हणाला, “हे तुम्ही काय केले? मी राहेलसाठी सात वर्षे काम केले आणि तुम्ही माझी अशी फसवणूक का केली?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सकाळी याकोबाने पाहिले तो पाहा, ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले?”