Genesis 3:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून परमेश्वर सर्पाला म्हणाला, “तू हे फार वाईट केलेस म्हणून तुझे पण वाईट होईल. तू हे केलेस म्हणून इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा तू अधिक शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, “तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशू व वनचर ह्यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो; तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह परमेश्वर सर्पाला म्हणाले, “कारण तू हे केलेस म्हणून, “तू सर्व पाळीव प्राण्यांहून, आणि सर्व वन्यपशूहून अधिक शापित आहेस! तू तुझ्या पोटावर सरपटशील आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस माती खाशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर देव सर्पास म्हणाला, “तू हे केल्यामुळे सर्व गुरेढोरांमध्ये व सर्व वन्यपशूंमध्ये तू शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील.