Genesis 3:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
संध्याकाळी परमेश्वर बागेत फिरत होता. त्यावेळी आदामाने आणि त्याच्या बायकोने परमेश्वराचा आवाज ऐकला. आणि त्याच्या नजरेस पडू नये म्हणून ती दोघे परमेश्वरापासून बागेच्या झाडात लपली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिवसाचा थंड वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत आला. त्या वेळी त्यांनी त्याचा आवाज ऐकला. आणि परमेश्वर देवाच्या समक्षतेपासून दृष्टीआड व्हावे म्हणून मनुष्य व त्याची पत्नी बागेच्या झाडांमध्ये लपली.