Genesis 30:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लेआने उत्तर दिले, “अगोदरच तू माझा नवरा घेतलास तर घेतलास, आणि आता माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुलेही तू माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न करतेस काय?” परंतु राहेल म्हणाली, “जर तुझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुले मला देशील तर त्यांच्या मोबदल्यात आज रात्री तुला याकोबापाशी निजावयाला मिळेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ती तिला म्हणाली, “माझा नवरा तू घेतलास हे काय थोडे झाले म्हणून तू माझ्या मुलाने आणलेली फळेही घेऊ पाहतेस?” राहेल म्हणाली, “तुझ्या मुलाने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फळांचा मोबदला म्हणून नवरा आज रात्री तुझ्यापाशी निजेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण लेआ तिला म्हणाली, “माझा पती घेतलास तेवढे पुरे झाले नाही काय? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देखील तू घेशील काय?” राहेल म्हणाली, “ठीक आहे. तुझ्या पुत्रदात्रीच्या फळांच्या मोबदल्यात, याकोब आज रात्री तुझ्याकडे येईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेआ तिला म्हणाली, “तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून घेतलेस हे काय कमी झाले? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळेही तू घेतेस काय?” राहेल म्हणाली, “तुझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे मला देशील तर त्याच्या बदल्यात आज रात्री तो तुझ्याबरोबर झोपेल.”