Genesis 30:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याकोब शेतावरुन त्या रात्री घरी आला; लेआने त्याला पाहिले व ती त्याला भेटावयास बाहेर गेली; व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याजवळ निजणार आहात कारण माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुले राहेलीस देऊन मी त्यांचा मोबदला भरुन दिला आहे.” तेव्हा याकोब त्या रात्रीं लेआपाशी निजला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
संध्याकाळी याकोब शेतातून घरी आला तेव्हा लेआ त्याला सामोरी जाऊन म्हणाली, “आपण माझ्यापाशी या; माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फळे देऊन मी आपणाला खरोखर भाड्याने घेतले आहे.” तेव्हा त्या रात्री तो तिच्यापाशी निजला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा संध्याकाळी याकोब शेतातून आला, लेआ त्याला भेटण्यासाठी बाहेर गेली. ती म्हणाली, “आज तुम्ही माझ्याबरोबर निजावे, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हाला त्या मोबदल्यात घेतले आहे.” त्याप्रमाणे त्या रात्री तो तिच्यासोबत निजला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
संध्याकाळी याकोब शेतावरून आला. तेव्हा लेआ त्यास भेटण्यास बाहेर गेली व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर झोपणार आहात, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हास मोलाने घेतले आहे.” तेव्हा याकोब त्या रात्री लेआपाशी झोपला.