Genesis 30:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर कधीही तुम्ही पाहाल तर मी प्रामाणिक आहे किंवा नाही हे सहज तुम्हाला दिसेल, तुम्ही कधीही येवून माझे कळप पाहू शकात; जर त्यात तुम्हाला ठिबकेदार व पट्टे नसलेली शेरडे व काळी नसलेली मेंढरे आढळली तर ती मी चोरली असे तुम्हाला समजेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उद्या आपण माझ्या वेतनाचा हिशोब पाहायला आलात तर माझ्या प्रामाणिकपणाची आपल्यालाही साक्ष पटेल; म्हणजे शेरडांपैकी जी ठिपकेदार व कबरी नाहीत व मेंढरांपैकी जी काळी नाहीत अशी काही माझ्याजवळ निघाली तर ती चोरीची समजा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जेव्हा तुम्ही मला दिलेले वेतन तपासाल तेव्हा भविष्यात माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी साक्ष देईल. म्हणजे माझ्या कळपात तुम्हाला एखादा डाग व ठिपके नसलेला बोकड किंवा मेंढा आढळला, तर मी तो तुमच्या कळपातून चोरून घेतला आहे, हे तुम्हाला समजेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर तुमच्यापुढे असलेल्या माझ्या वेतनाविषयी हिशोब घ्यायला याल तेव्हा माझा प्रामाणिकपणा माझ्याकरिता साक्ष देईल, जर त्यामध्ये तुम्हास माझ्याजवळच्या शेळ्यांतले जे प्रत्येक ठिपकेदार व तपकरी नाही व मेंढरांतले जे काळे नाही ते आढळले, तर ते मी चोरले आहे असे समजावे.”