Genesis 31:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“देवदूत म्हणाला, ‘पाहा, फक्त ठिबकेदार व बांडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत! हे मी घडवून आणीत आहे. लाबान तुझ्याशी अन्यायाच्या गोष्टी कशा करीत आहे ते मी पाहिलेले आहे; म्हणूनच मी हे करीत आहे की त्यामुळे तुला नवीन जन्मलेली सर्व करडे मिळावीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “आपली दृष्टी वर करून पाहा; मेंढ्यांवर उडणारे सर्व एडके बांडे, ठिपकेदार व करडे आहेत; लाबान तुझ्याशी कसा वागत आहे हे मी पाहिले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यांनी मला सांगितले, ‘तुझी नजर वर कर आणि पाहा की, फळविणारे बोकड पट्टेदार, डाग असलेले व ठिपकेदार आहेत. कारण लाबानाने तुझ्याशी कसा व्यवहार केला हे सर्व मी पाहिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो म्हणाला, “आपले डोळे वर करून पाहा, ‘फक्त ठिपकेदार व बांडे, करडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत. लाबान तुला काय करीत आहे ते सर्व मी पाहिले आहे.