Genesis 31:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेथेलमध्ये जो मी तुझ्याकडे आला तो मी देव; आहे; त्या ठिकाणी तू वेदी बांधलीस, तिच्यावर तेल ओतलेस आणि तू मला वचन दिलेस आता तू ज्या देशात जन्मलास त्या आपल्या मायदेशी परत जाण्यास तयार असावेस अशी माझी इच्छा आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेथेल येथे तू एका स्तंभाला अभ्यंग करून मला नवस केला तेथला मी देव आहे; आता ह्या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमीस परत जा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मीच तुला बेथेलमध्ये भेटलेला परमेश्वर आहे. त्या ठिकाणी तू स्तंभाला तैलाभ्यंग करून शपथ वाहिली होती. आता तू हा देश सोडून आपल्या मायदेशी परत जा.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेथेलचा मी देव आहे. जेथे तू एका स्मारकस्तंभास अभिषेक केलास, जेथे नवस करून तू मला वचन दिले, आणि आता तू हा देश सोड आणि आपल्या जन्मभूमीस परत जा.’”