Genesis 31:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे परंतु गेल्या रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात आला आणि मी तुला कोणत्याच प्रकारे अपाय करु नये म्हणून त्याने मला ताकीद दिली आहे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला अपाय करण्याचे सामर्थ्य मला आहे, पण काल रात्री तुझ्या वडिलांच्या देवाने मला सांगितले की, सांभाळ, याकोबाला बरेवाईट काही बोलू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुझे नुकसान करू शकलो असतो, पण तुझ्या पूर्वजांचे परमेश्वर काल रात्री मला म्हणाले, ‘सावध राहा, तू याकोबला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे, परंतु काल रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात बोलला आणि म्हणाला, ‘तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नको म्हणून काळजी घे.’