Genesis 31:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग याकोबाला फार राग आला. तो म्हणाला, “मी काय वाईट केले आहे? मी कोणता करार मोडला आहे? माझा पाठलाग करण्याचा आणि मला थांबविण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा याकोब रागावला. लाबानाशी तक्रार करू लागला; याकोबाने लाबानाला म्हटले, “आपण माझा पाठलाग करावा असा कोणता अपराध, कोणते पातक मी केले?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याकोबाला लाबानाचा खूप संताप आला. त्याने रागाने विचारणा केली, “माझा काय अपराध आहे? मी कोणता गुन्हा केला आहे, की तुम्ही माझा पाठलाग करीत आहात?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याकोबाला राग आला आणि त्याने लाबानाशी वाद केला, तो त्यास म्हणाला, “माझा गुन्हा काय आहे? माझे पाप कोणते आहे, म्हणून तुम्ही माझा रागाने पाठलाग केलात?