Genesis 31:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही तपासून पाहिल्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या मालकीची एकही चीजवस्तू आढळली नाही; जर तुम्हाला तुमचे काही मिळाले असेल तर ते मला दाखवा; ते या ठिकाणी समोर ठेवा म्हणजे तुमची आमची माणसे ते बघतील. तुमच्या व माझ्यामध्ये कोण खरा आहे हे या माणसांना ठरवू द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपण माझ्या सर्व सामानाची झडती घेतली त्यांत आपल्या घरच्या काही वस्तू सापडल्या काय? सापडल्या असल्यास त्या ह्या माझ्या व आपल्या भाऊबंदांसमोर ठेवा; म्हणजे त्यांना आपल्या दोघांचा निवाडा करता येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या सर्व सामानाची झडती घेतलीत. आता मी तुमचे जे काही चोरले असेल, ते तुमच्या आणि माझ्या लोकांच्या पुढे ठेवा. त्यांनाच ते पाहू द्या आणि ते कोणाचे आहे हे ठरवू द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही शोधून पाहिल्या आहेत. तुम्हास तुमच्या मालकीची एकतरी चीजवस्तू आढळली का? जर तुम्हास तुमचे काही मिळाले असेल तर ते आपल्या नातलगासमोर ठेवा. यासाठी की ते आपल्या दोघांचा न्याय करतील.