Genesis 31:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एखाद्या वेळी जर एखादी मेंढी जनावरांनी ठार मारली तर ती मी नेहमीच माझ्या कळपातून भरुन दिली. मी कधीही मेलेले जनावर तुमच्याकडे घेऊन आलो नाही आणि यात माझा काही दोष नाही असे म्हणालो नाही. दिवसा व रात्री मी तुमच्या कळपाची काळजी घेतली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वनपशूंनी जी फाडून खाल्ली ती तशीच आपल्याकडे न आणता मी त्यांच्याऐवजी दुसरी भरून दिली; दिवसा-रात्री चोरीस गेलेली आपण माझ्यापासून भरून घेतलीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुमच्याकडे वनपशूंनी फाडलेले प्राणी आणले नाहीत; मी स्वतः नुकसान सहन केले आणि दिवसा किंवा रात्री जे काही चोरीला गेले त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून भरून घेतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जनावरांनी फाडलेले ते मी तुमच्याकडे आणले नाही. त्याऐवजी ते नुकसान मी भरून दिले. दिवसा किंवा रात्री चोरी गेलेले, प्रत्येक हरवलेले जनावर ते तुम्ही नेहमी माझ्या हातून भरून घेत होता.