Genesis 31:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वीस वर्षे एखाद्या गुलामासारखी मी तुमची सेवाचाकरी केली; पाहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुली जिंकण्यासाठी आणि शेवटची सहा वर्षे तुमचे कळप वाढावेत म्हणून मी कष्ट केले; आणि त्या काळात दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गेली वीस वर्षे मी आपल्या घरी काढली; चौदा वर्षे आपल्या दोन्ही मुलींसाठी आणि सहा वर्षे आपल्या शेरडामेंढरांसाठी मी आपली चाकरी केली. आणि दहादा आपण माझ्या वेतनात फेरबदल केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशा स्थितीत मी वीस वर्षे काढली. चौदा वर्षे तुमच्या दोन मुली मिळविण्याकरिता आणि सहा वर्षे कळप मिळविण्याकरिता आणि तेवढ्या काळात तुम्ही दहा वेळेस माझ्या वेतनात फेरबदल केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वीस वर्षे मी तुमच्या घरी राहिलो; पहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुलींसाठी आणि सहा वर्षे तुमच्या कळपांसाठी. दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला.