Genesis 31:46 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने त्याच्या माणसांना आणखी काही दगड शोधून त्यांची रास करण्यास सांगितले. नतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग याकोब आपल्या भाऊबंदांना म्हणाला, “धोंडे जमा करा,” आणि त्यांनी धोंडे गोळा करून त्यांची रास केली; आणि तेथे त्या राशीजवळ ते जेवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि याकोबाने आपल्या नातेवाईकांना म्हटले, “काही दगड गोळा करा.” त्यांनी त्यांची रास केली, मग त्या सर्वांनी दगडाच्या राशी जवळ बसून एकत्र भोजन केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोब त्याच्या नातलगांना म्हणाला की, “दगड गोळा करा.” मग त्यांनी दगड गोळा करून त्याची रास केली. नंतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले.