Genesis 31:50 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर लाबान म्हणाला, “जर का तू माझ्या कन्यांना दु:ख देशील तर देव तुला शिक्षा करील हे लक्षात ठेव. जर का तू इतर स्त्रियांशी लग्न करशील तर देव पाहात आहे हे लक्षात ठेव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू माझ्या मुलींना दु:ख दिले किंवा त्यांखेरीज अन्य स्त्रिया केल्यास तर पाहा; तुझ्यामाझ्यामध्ये कोणी मानव नसला तरी देव साक्षी आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू माझ्या मुलींना निर्दयतेने वागविलेस किंवा अन्य स्त्रिया केल्यास, “जरी आपल्यासोबत कोणीही नसेल, तरीपण परमेश्वर तुझ्यात व माझ्यात साक्षी आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर का तू माझ्या मुलींना दुःख देशील किंवा माझ्या मुलींशिवाय दुसऱ्या स्त्रिया करून घेशील. तर पाहा, “जरी आमच्याबरोबर कोणी नाही पण तुझ्यात व माझ्यात देव साक्षी आहे.”