Genesis 31:52 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची आपणास आठवण देण्यास मदत करोत ही ओलांडून मी तुझ्या विरुद्व भांडणतंटा करण्यास तुझ्याकडे कधीही जाणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्व भांडणतंटा करण्यास माझ्या बाजूकडे, ही ओलांडून कधीही येऊ नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही रास व हा स्तंभ साक्षी असो; अनिष्ट करण्याच्या हेतूने मी ही रास ओलांडून तुझ्याकडे येणार नाही. तूही ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्याकडे येऊ नयेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे ओलांडून मी तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तू देखील ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्यावर हल्ला करणार नाही. ही रास व स्तंभ याची साक्ष आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची साक्ष होवो, की हानी करायला मी तुझ्याकडे ही रास ओलांडून येणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्ध ही रास ओलांडून कधीही येऊ नये.