Genesis 31:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“एकदा लाबान म्हणाला, ‘सर्व ठिबकेदार शेळ्या तू ठेवून घे, त्या तुला वेतनादाखल होतील,’ त्याने असे म्हटल्यानंतर सर्व शेळ्यांना ठिबकेदार करडे होऊ लागली; तेव्हा अर्थात् ती सर्व माझी झाली; परंतु मग लाबान म्हणाला, ‘तू बांड्या बकऱ्या घे; त्या तुला वेतना दाखल होतील;’ त्याने असे म्हटल्यानंतर सर्व बकऱ्यांना बांडी करडे होऊ लागली,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने जेव्हा म्हटले की, ‘ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुला वेतनादाखल मिळतील,’ तेव्हा सर्व कळपांना ठिपकेदार पोरे होऊ लागली; त्याने जेव्हा म्हटले की, ‘बांड्या तुझ्या,’ तेव्हा सर्व कळपांना बांडी पोरे होऊ लागली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ज्यावेळी त्यांनी म्हटले की, डाग असलेल्या शेळ्यामेंढ्या तुझ्या, त्यावेळी सर्व कळपांना डाग असलेली करडे होत. जेव्हा ते आपले मन बदलून म्हणत, पट्टेदार शेळ्यामेंढ्या तुझ्या, तेव्हा त्यांना सर्व पट्टेदार करडे होत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा तो म्हणाला, सर्व ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुझे वेतन होतील, सर्व शेळ्यामेंढ्यांना ठिपकेदार करडे होऊ लागली. परंतु मग लाबान म्हणाला, तू बांड्या बकऱ्या घे; त्या तुला वेतनादाखल होतील. त्याने असे म्हटल्यानंतर सर्व बकऱ्यांना बांडी करडे होऊ लागली,