Genesis 32:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू माझ्यावर दया केली आहेस आणि माझ्या करिता अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेस हे मी जाणतो. मी पहिल्याच वेळी यार्देन नदी उतरुन प्रवास केला तेव्हा माझ्याजवळ एका काठी शिवाय माझ्या मालकीचे काहीही नव्हते; परंतु आता माझ्या मालकीच्या, भरपूर वस्तूंच्या व माणसांच्या पूर्ण दोन टोळ्या आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहेस त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही मला वचन दिल्याप्रमाणे जी वात्सल्य आणि विश्वसनीयता वारंवार दाखविलीस तिला वास्तविक मी पात्र नाही; मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय दुसरे काहीही नव्हते आणि आता माझे दोन गट झाले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू माझ्यावर करुणा व सर्व सत्य विश्वसनीयता दाखवून, करार पाळून, आपल्या दासासाठी जे काही केले आहेस, त्यास मी पात्र नाही. आणि मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय काहीही नव्हते. परंतु आता माझ्या दोन टोळ्या आहेत.