Genesis 33:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला; त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाडले. लेआ व तिची मुले यांचा एक गट, राहेल व योसेफ यांचा आणखी एक गट, आणि त्याच्या दोन दासी व त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर याकोबाने दृष्टी वर करून पाहिले तर एसाव चारशे माणसे बरोबर घेऊन येत आहे असे त्याला दिसले; तेव्हा त्याने लेआ व राहेल आणि त्या दोन दासी ह्यांच्याकडे आपापली मुले दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर दूर अंतरावरून एसाव आपल्या चारशे माणसांबरोबर येत आहे असे याकोबाने पाहिले, तेव्हा त्याने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोबाने वर पाहिले आणि पाहा, त्यास एसाव येताना दिसला आणि त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली.