Genesis 33:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याकोब म्हणाला, “नाही नाही; मी आपणाला आग्रहाची विनंती करतो, आपण जर खरोखर माझा स्वीकार करिता तर मग कृपाकरुन मी आपणाला देतो त्या भेटीचा स्वीकार करा; आपले तोंड मला पुन्हा पाहावयास मिळाले म्हणून मला फार आनंद होत आहे; जणू काय मला देवाचे मुख पाहावयास मिळाले आहे. आपण माझा स्वीकार करिता म्हणूनही मला अतिशय आनंद वाटतो;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोब म्हणाला, “नाही, नाही; आपली माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर माझ्या हातची एवढी भेट घ्याच, कारण आपले दर्शन मला झाले हे जणू काय देवाच्या दर्शनासारखे आहे आणि आपण माझ्यावर संतुष्ट झाला आहात,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नाही, नाही!” याकोब म्हणाला, “जर तुमची माझ्यावर कृपा झाली असल्यास या भेटींचा तुम्ही स्वीकार करा. कारण तुम्ही आता मला स्वीकारले आहे म्हणून तुमचे मुख बघून परमेश्वराचे मुख बघितल्यासारखे वाटते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोब म्हणाला, “मी आपणाला विनंती करतो, असे नको, आता जर मी तुमच्या दृष्टीने खरोखर कृपा पावलो तर माझ्या हातून या भेटीचा स्विकार करा, कारण मी आपले तोंड पाहिले, आणि जणू काय देवाचे मुख पाहावे तसे मी तुमचे मुख पाहिले आहे आणि आपण माझा स्विकार केला.