Genesis 33:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु याकोब त्याला म्हणाला, “माझी मुले नाजुक आहेत हे आपणाला माहीत आहे; आणि माझ्या कळपातली दुभती जनावरे व त्यांची कच्ची बच्ची, करडे कोंकरे, वासरे यांची मला काळजी घेतली पाहिजे. मी जर त्यांच्यावर एकाच दिवशी अधिक दौड लादली तर सगळी जनावरे मरुन जातील;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोब त्याला म्हणाला, “माझ्या स्वामीला ठाऊक आहे की ही मुले सुकुमार आहेत; आणि दूध पाजणार्‍या शेळ्या, मेंढ्या व गाई ह्यांचे मला पाहिले पाहिजे; त्यांची एक दिवस फाजील दौड केली तर अवघा कळप मरून जाईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण याकोब त्यास म्हणाला, “काही मुले फार लहान आहेत हे माझ्या स्वामीला दिसतच आहे आणि दूध पाजणार्‍या शेळ्या, मेंढ्या व गाई यांचेही मला पाहिले पाहिजे. त्यांना मी दिवसभर असेच हाकीत नेले तर ती जनावरे मरून जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु याकोब त्यास म्हणाला, “माझी मुले लहान आहेत हे माझ्या स्वामीला माहीत आहे, आणि माझी मेंढरे व गुरेढोरे यांच्या पिल्लांची मला काळजी घेतली पाहिजे. मी जर त्यांची एका दिवशी अधिक दौड केली, तर सगळी जनावरे मरून जातील.