Genesis 33:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एसावाने विचारले, “इकडे येताना मला दिसले ते लोक कोण? व त्यांच्या बरोबरची जनावरे कशासाठी?” याकोबाने उत्तर दिले, “आपण माझा स्वीकार करावा म्हणून देणगी दाखल मी आपणाला दिलेली ही भेट आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने म्हटले, “मला तुझा हा सर्व तांडा भेटला तो कशाला?” तो म्हणाला, “माझ्या स्वामीची कृपादृष्टी व्हावी म्हणून.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसावाने विचारले, “जी गुरे व कळप मला भेटले त्याचा उद्देश काय आहे?” याकोब म्हणाला, “माझ्या धन्या, तुझ्या दृष्टीत मी कृपा पावावे म्हणून.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसावाने विचारले, “इकडे येताना मला भेटलेल्या सर्व टोळ्यांचा अर्थ काय आहे?” याकोबाने उत्तर दिले, “माझ्या धन्याच्या दृष्टीने मला कृपा मिळावी म्हणून.”