Genesis 34:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ह्या इस्राएल लोकांची आपल्याशी मैत्रीचे संबंध ठेवावयाची खरोखरच इच्छा आहे. त्यांना आपणामध्ये आपल्या देशात राहू द्यावे. व व्यापार करु द्यावा. त्यांनी आमच्याशी शांततेने राहावे असे आपल्यालाही वाटते; आपल्या सर्वांना पुरेल एवढा आपला देश मोठा आहे. त्यांच्या स्त्रियांशी लग्ने करण्यास आपणास मोकळीक आहे आणि आपल्या स्त्रिया त्यांना लग्नात देण्यात आपल्यालाही आनंद आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ही माणसे आपल्याबरोबर सलोख्याने राहणारी आहेत; तर ह्यांना देशात राहून व्यापारउदीम करू द्या, कारण पाहा, ह्यांना वस्ती करून राहण्यास पुरेल इतका हा देश विस्तीर्ण आहे; आपण त्यांच्या मुली बायका करू आणि आपल्या मुली त्यांना देऊ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते म्हणाले, “हे लोक आपले मित्र आहेत. त्यांना आपण आपल्यात राहण्याचे आमंत्रण देऊ आणि व्यापार करण्यास परवानगी देऊ; कारण आपला देश त्यांनाही पुरेल इतका मोठा असून त्यांना येथे सहज राहता येईल आणि त्यांच्या मुली आपण स्त्रिया करून घेऊ आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“ही माणसे आपल्याशी शांतीने वागतात, म्हणून त्यांना आपणामध्ये आपल्या देशात राहू द्यावे आणि त्यामध्ये व्यापार करू द्यावा. खरोखरच, त्यांना पुरेल एवढा आपला देश मोठा आहे. त्यांच्या मुली आपण स्त्रिया करून घेऊ, आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ.