Genesis 34:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु याकोब, शिमोन व लेवी यांना म्हणाला, “तुम्ही मला खूप त्रास देऊन संकटात टाकले आहे; आता या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी माझा द्वेष करतील व माझ्या विरुद्ध उठतील; आपण थोडकेच लोक आहोत. या देशातील सर्वलोक एकत्र होऊन आपल्या विरुद्ध जर लढावयास आले तर मग माझ्याजवळच्या आपल्या सर्वांचा माझ्याबरोबर नाश केला जाईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शिमोन व लेवी ह्यांना याकोब म्हणाला, “ह्या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी ह्यांना माझा वीट येईल असे करून तुम्ही मला संकटात घातले आहे; माझे लोक मूठभर आहेत, म्हणून ते एकजूट करून माझ्यावर येतील व माझी कत्तल करतील, आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याकोब, शिमओन व लेवी यांना म्हणाला, “या भूमीतील सर्व कनानी व परिज्जी लोकांना माझी किळस येईल असे वर्तन तुम्ही केले आहे. आपण अगदी थोडके आहोत; ते आपल्यावर चालून येतील आणि आपल्याला चिरडून टाकतील व आपण सर्वजण मारले जाऊ.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु याकोब, शिमोन व लेवी यांना म्हणाला, “तुम्ही मला खूप त्रास देऊन संकटात टाकले आहे; आता या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी माझा द्वेष करतील व माझ्या विरूद्ध उठतील. आपण थोडकेच लोक आहोत. या देशातील सर्व लोक एकत्र होऊन आपल्या विरूद्ध जर लढावयास आले तर मग माझ्याजवळच्या आपल्या सर्वांचा माझ्याबरोबर नाश केला जाईल.”