Genesis 34:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नगरात जे काही घडले त्या विषयीची बातमी याकोबाच्या मुलांनी शेतात ऐकली तेव्हा त्यांचा राग भयंकर भडकला, इतका की ते रागाने वेडे झाले, कारण याकोबाच्या मुलीशी केलेल्या वाईट कर्मामुळे शखेमाने इस्त्राएलाची अब्रू घेतली होती; म्हणून मग ते सगळे भाऊ शेतातून घरी आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे रानातून घरी आले; शखेमाने करू नये ते केले म्हणजे याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्राएलाशी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना मनस्वी दु:ख होऊन ते फार संतापले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेवढ्यात याकोबाचे पुत्रही रानातून घरी आले. शेखेमने इस्राएलात अशी भयानक गोष्ट करून याकोबाच्या कन्येला भ्रष्ट केल्याचे वृत ऐकून त्यांना मोठा धक्का बसला आणि ते संतप्त झाले कारण ही अपमानजनक गोष्ट घडणे अत्यंत घृणास्पद होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे काही घडले ते याकोबाच्या मुलांनी रानात ऐकले आणि ते परत आले. ती माणसे दुखावली गेली होती. त्यांचा राग भडकला होता, कारण याकोबाच्या मुलीवर शखेमाने बळजबरी करून इस्राएलाला काळिमा लावला, जे करू नये ते त्याने केले होते.