Genesis 35:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव याकोबाला म्हणाला, “तू बेथेल या नगरात जाऊन राहा; आणि तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना त्या ठिकाणी ज्याने तुला दर्शन दिले त्या ‘एल’ (म्हणजे इस्राएलाचा देव) याची आठवण कर व त्याच देवाची उपासना करण्यासाठी तेथे एक वेदी बांध.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग देवाने याकोबाला सांगितले की, “ऊठ, वर जाऊन बेथेल येथे राहा; आणि तू आपला भाऊ एसाव ह्याच्यापुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग परमेश्वराने याकोबाला म्हटले, “ऊठ आणि बेथेलला जाऊन तिथेच स्थायिक हो. तुझा भाऊ एसाव, याच्यापासून तू पळून जात असता, ज्या परमेश्वराने तुला दर्शन दिले होते, तिथे त्याच परमेश्वरासाठी एक वेदी बांध.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव याकोबाला म्हणाला, “ऊठ, बेथेल नगरामध्ये जा आणि तेथे राहा. तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना ज्याने तुला दर्शन दिले, त्या देवासाठी तेथे एक वेदी बांध.”