Genesis 37:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शखेमाजवळ योसेफ वाट चुकला; तो शेतात इकडे तिकडे भटकताना एका माणसाला आढळला त्या माणसाने त्याला विचारले, “तू कोणाला शोधत आहेस?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तेथे रानात इकडेतिकडे भटकत असता एका मनुष्याला आढळला, तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू काय शोधत आहेस?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो शेतातून फिरत असता त्याला एका मनुष्याने पाहिले आणि त्याने योसेफाला विचारले, “तू काय शोधीत आहेस?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योसेफ शेतात भटकत होता. पाहा, तो कोणा मनुष्यास दिसला. त्या मनुष्याने त्यास विचारले, “तू काय शोधत आहेस?”