Genesis 38:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदा रस्त्याने चालला होता. त्याने तिला पाहिले परंतु ती एक वेश्या असावी असे त्याला वाटले; (कारण वेश्या जसे आपले तोंड झाकतात तसे तिने आपले तोंड बुरख्याने झाकले होते.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाने तिला पाहिले तेव्हा त्याला वाटले, ‘ही कोणी वेश्या असावी,’ कारण तिने आपले तोंड झाकले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथून जाताना यहूदाहने तिला पाहिले आणि तिच्या तोंडावर बुरखा असल्यामुळे त्याला वाटले की ती एक वेश्या आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाने तिला पाहिले, परंतु ती एक वेश्या असावी असे त्यास वाटले. तिने आपले तोंड झाकले होते.