Genesis 38:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदा म्हणाला, “मी तुला बकरा पाठवून देईन त्यासाठी पुरावा म्हणून तुझ्यापाशी मी काय हडप ठेवावे अशी तुझी इच्छा आहे?” तामार म्हणाली, “तुम्ही कागदपत्रे, करार वगैरेवर उमटवयासाठी व सीलबंद करण्यासाठी जो शिक्का व जी दोरी वापरता ती मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. आणि त्यामुळे ती गरोदर राहिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “तुला काय हडप देऊ?” ती म्हणाली, “तुझी मुद्रिका, गोफ, व हातातील काठी दे.” ते तिला देऊन तो तिच्यापाशी गेला, आणि तिला त्याच्यापासून गर्भ राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुला काय तारण हवे आहे?” त्याने तिला विचारले. तिने उत्तर दिले, “तुमची मुद्रिका, गोफ आणि हातातील काठी.” याप्रमाणे त्याने या वस्तू तिला दिल्या आणि तिने त्याला आपल्याशी रत होऊ दिले, परिणामी ती गर्भवती झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदा म्हणाला, “गहाण म्हणून मी तुझ्याकडे काय ठेवू?” तामार म्हणाली, “तुम्ही अंगठी, गोफ व हातातली काठी मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. त्याच्यापासून ती गरोदर राहिली.