Genesis 38:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपण कबूल केल्याप्रमाणे त्या वेश्येला बकरा देण्यासाठी यहुदाने आपला मित्र हीरा याला एनाईम गांवाला त्या वेश्येकडे पाठवले. त्याचप्रमाणे आपण तिला दिलेल्या, शिक्का, दोरी व काही वस्तू तिजकडून घेऊन येण्यास सांगितले, परंतु हीराला ती वेश्या सांपडली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्या स्त्रीपासून आपले हडप आणण्यासाठी आपला मित्र अदुल्लामकर ह्याच्या हाती यहूदाने एक करडू पाठवले; पण त्याला ती कोठे सापडली नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाहने आपला अदुल्लामी मित्र हीरा, याला तिच्याकडे कोवळी शेळी घेऊन जाण्यास आणि तिला दिलेल्या गहाण वस्तू परत आणण्यात सांगितले; पण हीराला ती सापडली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाने आपला मित्र अदुल्लामकर ह्याला आपल्या कळपातील करडू घेऊन त्या स्त्रीला तारण म्हणून दिलेल्या वस्तू आणावयास पाठवले, परंतु त्यास ती सापडली नाही.