Genesis 38:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने एनाईम गांवातील काही लोकांना विचारले, “येथे ह्या रस्त्याच्या बाजूला होती ती वेश्या कोठे आहे?” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने तेथल्या लोकांना विचारले, “एनाईम गावच्या वाटेवर एक वेश्या1 होती ती कोठे आहे?” ते म्हणाले, “येथे कोणी वेश्या नव्हती.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून त्याने एनाईम गावातील काही लोकांना विचारले, “गावाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर बसलेली देवदासी कुठे राहते?” “आमच्या गावात तर कोणी देवदासी राहत नाही,” त्यांनी त्याला उत्तर दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अदुल्लामकराने तेथील काही लोकांस विचारले, “येथे या एनाईमाच्या रस्त्यावर एक वेश्या होती ती कोठे आहे?” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.”