Genesis 38:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले; म्हणून मग ती सुईण म्हणाली, “हं! मग तू प्रथम वाट काढून जन्मलास तर!” म्हणून त्यांनी त्याचे नाव पेरेस (म्हणजे हिब्रू भाषेप्रमाणे ‘वाट काढणारा’) असे ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपला हात आखडून घेतला तेव्हा त्याचा भाऊ बाहेर पडला. तेव्हा सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस?” म्हणून त्याचे नाव ‘पेरेस’1 असे ठेवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्याने त्याचा हात मागे ओढून घेतला आणि त्याचा भाऊ बाहेर आला, ती म्हणाली, “तर अशाप्रकारे तू वाट काढली!” आणि त्याचे नाव पेरेस ठेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले. म्हणून मग ती सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस!” आणि त्याचे नाव पेरेस असे ठेवले.