Genesis 39:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि तिने आरडा ओरडा करुन बाहेरील माणसांना बोलावले. ती म्हणाली, “पाहा, हा इब्री तरुण गुलाम आमच्या घरच्या माणसांची अब्रू घेण्यासाठी येथे आणून ठेवला आहे. त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठयाने आरडा ओरडा केला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तिने घरातल्या माणसांना बोलावून सांगितले, “पाहा, आमची अब्रू घेण्यासाठी त्यांनी हा इब्री मनुष्य घरात आणला आहे; तो माझ्यापाशी निजण्याच्या हेतूने माझ्याजवळ आला तेव्हा मी मोठ्याने ओरडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तिने घरातील सेवकांना बोलाविले. ती म्हणाली, “आमच्या घराचा उपमर्द करण्यासाठीच हा इब्री गुलाम घरात आणला आहे! त्याने माझ्यासोबत निजण्याचा प्रयत्न केला, पण मी किंचाळले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तिने हाक मारून तिच्या घरातील मनुष्यांना बोलावले. आणि ती म्हणाली, “पाहा, पोटीफराने या इब्र्याला आमच्या घरच्या मनुष्यांची अब्रू घेण्यासाठी आणून ठेवले आहे. त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठ्याने ओरडले.