Genesis 39:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि आपला नवरा घरी आल्यावर तिने त्याला तीच गोष्ट सांगितली. ती म्हणाली, “तुम्ही हा जो इब्री तरुण गुलाम घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आल्यावर तिने त्याला असे सांगितले की, “जो इब्री दास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझी अब्रू घेण्यास माझ्याकडे आला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर तिने त्याला आपली कथा सांगितली: “जो इब्री गुलाम तुम्ही इकडे आणला आहे, त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर तिने त्यास सांगितले. ती म्हणाली, “तुम्ही हा जो इब्री घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.