Genesis 39:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुरुंगाच्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व गोष्टीसाठी योसेफावर विश्वास ठेवला; परमेश्वर योसेफाबरोबर होता म्हणून हे सर्व काही झाले. योसेफ जे काही करी त्यात परमेश्वर त्याला यश देई.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदिशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर तुरुंगाच्या अधिकार्याला कसलीच काळजी उरली नाही, कारण याहवेह योसेफाबरोबर होते आणि तो जे काही करत असे त्यामध्ये ते त्याला यश देत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुरुंगाचा अधिकारी त्याच्या हाताखालील कोणत्याही कामाबद्दल काळजी करीत नसे. कारण परमेश्वर त्याच्याबरोबर होता. तो जे काही करी, त्यामध्ये परमेश्वर देव त्यास यश देई.