Genesis 4:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लामेख आपल्या बायकांना म्हणाला, “आदा आणि सिल्ला माझी वाणी ऐका; लामेखाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो तिकडे कान द्दा; एका माणसाने मला जखमी केले, तेव्हा मी त्याला ठार मारले, एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्याला ठार केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लामेख आपल्या बायकांना म्हणाला, “आदा आणि सिल्ला, तुम्ही माझी वाणी ऐका, लामेखाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या; एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला ठार मारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी लामेख आपल्या पत्नींना म्हणाला, आदाह व सिल्ला माझे ऐका, “लामेखाच्या पत्नींनो, माझे बोलणे ऐका. एका तरुणाने माझ्यावर हल्ला करून मला जखमी केले. पण त्या तरुणाला मी ठार मारले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लामेख आपल्या बायकांना म्हणाला, आदा आणि सिल्ला माझी वाणी ऐका; लामेखाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो त्याकडे कान लावा; एका मनुष्याने मला जखमी केले, मी त्यास ठार मारले, एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्यास ठार केले.