Genesis 4:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू जर चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील, मग मी तुझा स्वीकार करीन; परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालवू पाहील; पण तू त्या पापावर सत्ता चालवली पाहिजेस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुझ्यावर आहे. ह्याकरता तू त्याला दाबात ठेव.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू योग्य ते केलेस तर तुझाही स्वीकार केला जाणार नाही काय? पण तू योग्य ते करण्याचे नाकारशील तर सावध राहा, तुझा सर्वनाश करावा म्हणून पाप तुझ्या दारावर हल्ला करण्यास टपून बसले आहे; पण त्यावर तू विजय मिळव.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्विकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.”