Genesis 4:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही वेळाने परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वराने काइनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही; मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याहवेहने काईनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कुठे आहे?” “मला माहीत नाही.” त्याने प्रत्युत्तर दिले. “मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय?”