Genesis 40:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवक वर्गाला एक मेजवानी दिली; त्यावेळी त्याने त्या आचाऱ्याला व प्यालेबरदाराला तुरुंगातून सोडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिसर्या दिवशी फारोचा वाढदिवस आला तेव्हा त्याने आपल्या सर्व चाकरांना मेजवानी दिली, आणि त्याने आपल्या प्यालेबरदारांचा नायक व आचार्यांचा नायक ह्यांना पुढे आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता तिसर्या दिवशी फारोहचा वाढदिवस होता आणि त्याने आपल्या सर्व सरदारांसाठी मेजवानी दिली. त्याने आपल्या सरदारांसमोर मुख्य प्यालेबरदार आणि प्रमुख रोटी भाजणारा यांचे मस्तक उंचावले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवकवर्गाला एक मेजवानी दिली. त्या वेळी त्याने त्याचा आचारी आणि प्यालेबरदाराकडे त्याच्या इतर सेवकांपेक्षा अधिक लक्ष दिले.