Genesis 40:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या दोघांनी उत्तर दिले, “आम्हा दोघांना रात्री एक एक स्वप्न पडले; परंतु त्यांचा अर्थ आम्हाला समजत नाही; त्यांचा अर्थ सांगणारा किंवा उलगडा करणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “एकच म्हणजे केवळ देवच स्वप्नांचा अर्थ सांगू शकतो किंवा उलगडा करु शकतो; म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला तुमची स्वप्ने सांगा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याला म्हणाले, “आम्हांला स्वप्ने पडली आहेत व त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “अर्थ सांगणे देवाकडे आहे ना? आपापले स्वप्न मला सांगा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी उत्तर दिले, “काल रात्री आम्हा दोघांनाही स्वप्न पडले, पण आम्हाला त्यांचा अर्थ सांगणारा येथे कोणीच नाही.” यावर योसेफ म्हणाला, “स्वप्नांचा उलगडा करून सांगणे हे परमेश्वराकडूनच असते ना? स्वप्नात तुम्ही काय पाहिले ते सांगा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते त्यास म्हणाले, “आम्हा दोघांनाही रात्री स्वप्ने पडली, परंतु त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “स्वप्नांचा अर्थ सांगणे देवाकडे नाही काय? कृपया, आपापले स्वप्न मला सांगा.”