Genesis 41:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
व त्यांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली. “ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना, ज्योतिष्यांना व पंडितांना सांगितली; परंतु त्यांचा अर्थ कोणालाही सांगता आला नाही; तेव्हा त्यांचा अर्थ काय आहे?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्या सात खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली कणसे गिळून टाकली. मी हे जोतिष्यांना सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या अशक्त कणसांनी ती भरदार कणसे गिळून टाकली. मी हे सर्व माझ्या ज्योतिष्यांना सांगितले, परंतु त्यातील एकालाही स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बारीक कणसांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली. ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाही त्यांचा उलगडा करून सांगता आले नाही.”