Genesis 41:54 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु सात वर्षानंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली; तेव्हा कोणत्याच देशात कोठेही कसलेच पीक आले नाही; आणि लोकांना खावयास धान्य मिळेना; परंतु मिसरमध्ये मात्र योसेफाने धान्य साठवल्यामुळे लोकांपाशी खावयास भरपूर अन्न होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची सात वर्षे सुरू झाली, तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला, तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग योसेफाने भाकीत केल्याप्रमाणे दुष्काळाची सात वर्षे सुरू झाली. इजिप्त देशाच्या सभोवती असलेल्या सर्व देशांमध्ये सुद्धा दुष्काळ पडला; परंतु इजिप्तमध्ये अन्न होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सात वर्षांनंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली. सर्व देशांमध्ये दुष्काळ पडला होता, परंतु मिसरमध्ये मात्र अन्न होते.