Genesis 41:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नामुळे चिंतेत पडून बेचैन झाला व त्याने पंडितांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली; परंतु त्यांतील कोणालाच त्या स्वप्नांच अर्थ सांगता आला नाही किंवा त्याचा उलगडा करता आला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले, आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित ह्यांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुसर्या दिवशी सकाळी, स्वप्नांचा विचार करता फारोह चिंताक्रांत झाला. मग त्याने इजिप्तमधील सर्व ज्योतिष्यांना व ज्ञानी पुरुषांना बोलाविले आणि त्यांना आपले स्वप्न सांगितले. परंतु त्यापैकी एकालाही त्या स्वप्नाचा अर्थ काय असेल हे सांगता येईना.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नांमुळे चिंतेत पडून बेचैन झाला. त्याने मिसर देशातील जादूगार व ज्ञान्यांना बोलावले. फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाच त्या स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.