Genesis 42:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि नंतर तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या; मग तुम्ही खरेच प्रामाणिक व साळसूद माणसे आहात हे मला पटेल; नाही तर मग तुम्ही तुमच्या सेनापतीच्या हुकुमाने आमचा नाश करावयास आला आहात असे मी समजेन; तुम्ही जर खरे बोलत असाल तर मग मी तुमचा भाऊ परत तुमच्या हवाली करीन आणि मग तुम्हाला आपणाकरिता आमच्या देशातून धान्य विकत घेण्यासाठी ये जा करण्याची परवानगी असेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही आपल्या धाकट्या भावाला घेऊन या म्हणजे मला खात्री पटेल की तुम्ही हेर नाही, तर सरळ माणसे आहात; मग तुमचा भाऊ मी तुम्हांला परत देईन आणि तुम्हांला ह्या देशात येजा करता येईल.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या; मगच तुम्ही हेर नाहीत, तर प्रामाणिक माणसे आहात हे मला समजेल. तर मी तुमचा भाऊ तुम्हाला परत देईन व तुम्ही या देशात व्यापार करू शकाल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि नंतर तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. मग तुम्ही खरेच प्रामाणिक माणसे आहात हे मला पटेल. तुम्ही जर खरे बोलत असाल तर मग मी तुमचा भाऊ परत तुमच्या हवाली करीन आणि तुम्ही देशात व्यापार कराल.’”