Genesis 42:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग रऊबेन आपल्या बापास म्हणाला, “बाबा, मी जर बन्यामीनाला मागे आणले नाही तर माझे दोन मुलगे तुम्ही मारुन टाका; बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा! मी खरोखर बन्यामीनाला मागे तुमच्याकडे घेऊन येईन!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग रऊबेन आपल्या पित्याला म्हणाला, “मी जर त्याला तुमच्याकडे घेऊन आलो नाही तर माझे दोन मुलगे मारून टाका; त्याला माझ्या हवाली करा, मी त्याला परत तुमच्याकडे आणीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा रऊबेन आपल्या वडिलांस म्हणाला, “मी बिन्यामीनाला तुमच्याकडे परत आणले नाही तर तुम्ही माझ्या दोन मुलांना मारून टाका; बिन्यामीनाला माझ्या हवाली करा, मी त्याला परत तुमच्याकडे आणेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग रऊबेन आपल्या पित्यास म्हणाला, “मी जर बन्यामिनाला मागे आणले नाही तर माझे दोन पुत्र तुम्ही मारून टाका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरोखर बन्यामिनाला परत तुमच्याकडे घेऊन येईन.”