Genesis 43:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मिसरमध्ये त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामीनास पाहिले; तेव्हा योसेफ आपल्या कारभाऱ्यास म्हणाला, “या लोकांना माझ्या घरी आण. एक चांगला पोसलेला पशू मारुन भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योसेफाने त्यांच्याबरोबर बन्यामिनाला पाहिले तेव्हा तो घरच्या कारभार्‍याला म्हणाला, “ह्या माणसांना घरात ने, पशू मारून भोजन तयार कर, कारण आज दोन प्रहरी ही माणसे माझ्याबरोबर जेवणार आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीन त्यांच्याबरोबर आहे हे योसेफाने पाहिले, तेव्हा तो आपल्या घराच्या कारभार्‍याला म्हणाला, “या माणसांना माझ्या घरी घेऊन जा, पशू मार आणि भोजन तयार कर; ते दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामिनास पाहिले. तेव्हा तो आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “या लोकांस माझ्या घरी आण. पशू मारून भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”