Genesis 43:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वाढपी, योसेफाच्या पुढच्या मेजावरील पक्वान्ने घेऊन त्यांना वाढीत होते; परंतु त्यांनी बन्यामीनास इतरापेक्षा पांचपट अधिक वाढले. ते सर्व भाऊ योसेफाबरोबर भरपूर जेवले व मनमुराद प्यायले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग योसेफापुढची पक्वान्ने त्यांना नेऊन वाढली, पण बन्यामिनाला इतरांच्या पाचपट वाढले, आणि ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योसेफ, जी पक्वान्ने खात होता, तीच पक्वान्ने त्यांनाही वाढण्यात आली. पण बिन्यामीनाला इतर भावांपेक्षा पाचपट अधिक वाढण्यात आले. ते सर्व त्याच्यासोबत भरपूर जेवले व मनमुरादपणे पिऊन तृप्त झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योसेफाने त्याच्या पुढील पक्वान्नामधून वाटे काढून त्यांना दिले, पण त्याने बन्यामिनाला इतरांपेक्षा पाचपट अधिक वाढले. ते सर्व भरपूर जेवले व मनमुराद पिऊन आनंदीत झाले.